Monday, April 2, 2007

Should Sachin Retire?

भारतीय क्रिकेट संघात आता सचिन तेंडुलकर नको, असे भारतीय क्रिकेट मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांचे मत होते; पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यास कोणीही तयार नव्हते. आता ग्रेग चॅपेल यांनी हे काम सोपे केले आहे. भारतीय क्रिकेट मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- चॅपेल हे सचिन तेंडुलकरला कायमचा निरोप देण्याची शिफारस करणार आहेत.
गेल्या काही वर्षातला आपला हरपलेला सूर लक्षात घेऊन सचिन तेंडुलकरने आता निवृत्त व्हावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज इयन चॅपेल यांनी दिला आहे. सचिनने आपला जो लौकिक उभा केला होता त्या लौकिकानुसार सचिनकडून गेल्या तीन-चार वर्षांत खेळ झालेला नाही. कारकीर्द वाढविण्यासाठी तो आता प्रयत्नशील आहे, असे इयन चॅपेल यांनी म्हटले आहे.
मुंबईतील एका सायंदैनिकातील स्तंभलेखात इयन चॅपेल यांनी सचिनला निवृत्तीचा हा सल्ला दिला आहे.
Post a Comment